Skip to main content

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात चार जुलै कसा ठरला निर्णायक दिवस, जाणून घ्या…

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात चार जुलै कसा ठरला निर्णायक दिवस, जाणून घ्या…
Kargil Vijay Diwas: भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध सुरु झाल्यानंतर भारताचे सर्वात महत्वाचे लक्ष्य होते ते म्हणजे काहीही करुन टायगर हिल परत मिळवणे. टायगर हिलला पॉईंट ५०६२ सुद्धा म्हटले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये द्रास-कारगिल सेक्टरमध्ये टायगर हिल आहे. टायगर हिल हे त्या भागातील सर्वोच्च शिखर आहे. घुसखोरांनी या हिलवर ताबा मिळवल्यामुळे भारताचा महत्त्वाचा भूप्रदेश थेट शत्रूच्या टप्प्यात येत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टायगर हिलची लढाई जिंकणे भारतासाठी आवश्यक बनले होते.
– टायगर हिलवरुन पाकिस्तानी सैनिक सहजतेने राष्ट्रीय महामार्ग एकवर नजर ठेऊ शकत होते. या शिखरावरुन श्रीनगर-लेह मार्ग तसेच ५६ ब्रिगेडचे लष्करी मुख्यालय टप्प्यात येत होते. कारगिल सेक्टरला जीवनावश्यक वस्तू आणि अन्य साहित्याचा पुरवठा याच मार्गावरुन व्हायचा. पाकिस्तानी सैन्य राष्ट्रीय महामार्गाच्या २५ कि.मी.च्या टप्प्यातील भारतीय लष्कराच्या हालचालींना सहज टार्गेट करत होते. त्यामुळे टायगर हिलची लढाई भारतासाठी अत्यंत महत्वाची बनली होती.
– टायगर हिलच्या लढाईत १८ ग्रेनेडीयन्स, २ नागा आणि आठ शिख रेजिमेंट सहभागी झाल्या होत्या. एकूण २०० जवान या मोहिमेवर होते. १८ ग्रेनेडियन्सने अल्फा, चार्ली आणि घातक अशी तीन तुकडयांमध्ये आपल्या सैनिकांची विभागणी केली. या सर्वात खडतर मिशनला तीन जुलैच्या संध्याकाळी सात वाजता सुरुवात झाली. शिखराकडे कूच करणाऱ्या सैनिकांच्या मदतीसाठी लष्कराच्या तोफखान्याने जोरदार मारा सुरु केला. रॉकेट लाँचर्सद्वारे शत्रूला टार्गेट केले.
– आठ शिख रेजिमेंटने शत्रूने गृहित धरलेल्या मार्गावरुन चाल केली. शत्रूला गोंधळात टाकण्याची त्यामागे रणनिती होती. त्याचवेळी घातक तुकडीकडे अत्यंत धोकादायक मार्गावरुन शिखरावर पोहोचण्याचे आव्हान होते. शत्रू कल्पनाही करु शकणार नाही अशा पद्धतीने धक्का देण्याचा त्यामागे उद्देश होता.
– त्या रात्री टायगर हिलवर भारताच्या शूर जवानांनी आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला आणि शत्रूच्या ताब्यातून महत्वाचे ठिकाण पुन्हा मिळवले. चार जुलैला सकाळी टायगर हिलवर तिरंगा डौलाने फडकला. या घनघोर रणसंग्रामात पाच भारतीय जवान शहीद झाले तर दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या शौर्यासाठी योगेंद्र सिंह यादवला परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. टायगर हिल जिंकणे म्हणजे भारतासाठी मोठा रणनितीक विजय तर पाकिस्तानसाठी जबर मानसिक धक्का होता. 
.....loksatta news 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

{ Life } जीवन महत्वपूर्ण क्यों है?

      जीवन महत्वपूर्ण क्यों है? जीवन का एक महत्वपूर्ण पहलू यह है कि यह आगे बढ़ता रहता है। इसका मतलब कुछ भी स्थायी नहीं है। इसलिए, आपत्ति में बने रहने का एक कारण होना चाहिए। एक ख़ुशी का मौक़ा पास आएगा, एक उदास की तरह। इन सबसे ऊपर, किसी को भी आशावादी होना चाहिए चाहे वह कितनी भी बुरी चीज हो। ऐसा इसलिए है क्योंकि कुछ भी हमेशा के लिए नहीं रहेगा। हर स्थिति, अवसर और घटना बीत जाएगी। यह निश्चित रूप से जीवन का एक सौंदर्य है। कई लोग असफलताओं के कारण बहुत दुखी हो जाते हैं । हालांकि, ये लोग निश्चित रूप से उज्ज्वल पक्ष को देखने में विफल होते हैं। उज्ज्वल पक्ष यह है कि हर विफलता का एक कारण है। इसलिए, हर विफलता हमें एक मूल्यवान सबक सिखाती है। इसका मतलब है कि हर विफलता अनुभव का निर्माण करती है। यह अनुभव मनुष्यों के कौशल और दक्षता में सुधार करता है। संभवतः बड़ी संख्या में व्यक्तियों को शिकायत है कि जीवन एक दर्द है। बहुत से लोग मानते हैं कि दर्द शब्द जीवन का पर्याय है। हालांकि, यह दर्द है जो हमें मजबूत बनाता है। दर्द निश्चित रूप से मानसिक लचीलापन बढ़ाने का एक उत्कृष्ट तरीका है। ...

IBPS मार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती IBPS Recruitment 2020 IBPS RecruitmentInstitute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB IX, IBPS Recruitment 2020

IBPS मार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती IBPS Recruitment 2020 Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB IX, IBPS Recruitment 2020 (IBPS Bharti 2020) for 9638 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts. पदाचे नाव & तपशील:   पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4624 2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 3800 3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 100 4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 08 5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 03 6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 26 7 ऑफिसर स्केल-II (CA) 26 8 ऑफिसर स्केल-II (IT) 58 9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 837 10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 156 Total 9638 शैक्षणिक पात्रता:   पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.  पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.  पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव  पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अ...

CRPF Recruitment 2020 ( केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती)

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती CRPF Recruitment 2020 The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. Paramedical Staff Examination 2020. CRPF Recruitment 2020 (CRPF Bharti 2020) for 789 Inspector, Sub Inspector, Assistant Sub-Inspector, Head Constable, &  Constable Posts.  www.majhinaukri.in/crpf-recruitment  क्र. पदाचे नाव  पद संख्या  1 इंस्पेक्टर (आहारतज्ञ) 01 2 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) 175 3 सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर) 08 4 असिस्टंट  सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) 84 5 असिस्टंट  सब इंस्पेक्टर  (फिजिओ – थेरपिस्ट) 05 6 असिस्टंट  सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) 04 7 असिस्टंट  सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) 64 8 असिस्टंट  सब इंस्पेक्टर   (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी  टेक्निशियन) 01 9 हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध) 88 10 हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife) 03 11 हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस  टेक्निशियन ) 08 12 हेड कॉन्स्टेबल (ज्युनिय...